Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात 14 रोजी होणारा भंडारा कार्यक्रम रद्द
    यावल

    वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात 14 रोजी होणारा भंडारा कार्यक्रम रद्द

    saimat teamBy saimat teamOctober 13, 2021No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात 14 रोजी होणारा भंडारा कार्यक्रम रद्द
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या “श्री साईबाबा देवस्थान वनोली ” तालुका यावल या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सवाची पूर्ण तयारी झाली असून घटस्थापनेच्या नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही या वर्षी 14ऑक्टोबर21गुरुवार रोजी येत असल्याने या दिवशी महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावर्षी अजुन कोरोनाचे संकट कायम असल्याने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे.असे या मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य,आयोजक आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे.

    वनोली ता.यावल हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामणोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी शंभू महादेवाचे पिंडीची स्थापना व2 नंदादीप श्री साई बाबांच्या हस्ते लावण्यात आले होते ते आजही तेवत (जळत) आहेत.त्यावेळेस एकवेळा दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशा साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगता 565 वर्षापासुन याठिकाणी हे नंदादीप आजही ही जळतांना दिसत आहे.

    या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खऱ्या अर्थाने हिरालाल भाऊ चौधरी हे सरपंच असताना व 1995च्या युती शासना पासूनच तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन,व आमदार एकनाथराव खडसे,आमदार हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातूनच या गावाचा व परिसराचा विकास झाला अष्टमीच्या दिवशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक प्रसादासाठी या ठिकाणी येतात हे त्यावेळी या आमदारांनी प्रत्यक्ष पाहिले आहे व खऱ्या अर्थाने निधी येण्यास सुरुवात झाली आतापर्यंत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे,स्वर्गीय खासदार वाय जी महाजन सर,विद्यमान खासदार रक्षाताई खडसे,जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागला महाप्रसादासाठी व भाविकांसाठी थांबण्यासाठी आणि सभामंडपाचे काम तसेच बामणोद ते वनोली कोसगाव पाडळसा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला.

    तसेच मोर नदीच्या फुलांवर नदीला पूर आल्यामुळे भाविकांना येता येत नव्हते म्हणून कोसगाव वनोली येथे नद्यांमध्ये पूल बांधण्यात आले याठिकाणी पूर्वी गावांमध्ये हे महाप्रसादासाठी खूप गर्दी व्हायची त्यामुळे गावाच्या बाहेर जो विकास झालेला आहे तो युतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने झालेला दिसतो.भोजन कक्षासाठी टेकड्यांचे सपाटीकरण,भक्तनिवास,चौफेर कंपाऊंड,संरक्षण भिंत यासाठी करोडो रुपयांचा निधी खऱ्या अर्थानं यावल कृ.ऊ.बा.स.माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला.यावर्षी गेल्या आर्थिक वर्षामध्ये हे श्री साईबाबा मंदिराच्या परिसरासाठी15लाख रुपये रक्षाताई खडसे यांनी संरक्षण भिंत व पुन्हा7लाख रुपये काँक्रिटीकरण यासाठी निधी दिला.तसेच हरिभाऊ जावळे यांनी 5 लाखाचे काँक्रिटीकरण व10 लाख रुपयांचा सभामंडप याठिकाणी दिला.आहे तर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी पत्री शेड साठी जिल्हा नियोजन मधून अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत तशी घोषणा करणार आहेत.ग्रामपंचायत वनोली सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व साईबाबा ट्रस्टचे विश्वस्त हिरालाल चौधरी यांनी पालक मंत्री यांच्याकडे पत्री मोठ्या शेडसाठी पन्नास लाख रुपये उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालकमंत्र्यांकडे कंलेली आहे. पाळधी येथे त्यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन येथील सर्व अध्यात्मिक सामाजिक कथा व्यथा पालक मंत्र्यांसमोर सरपंच यांनी मांडलेली आहे याठिकाणी राजकारणविरहित काम चालतं सर्व गाव एकोप्याने अंगीकारतात सर्वपक्षीय कार्यकर्ते परिसरातील या ठिकाणी येतात व दानही देतात परमेश्वराच्या आराधनेने आपली मनोकामना पूर्ण होते अशी दृढ श्रद्धा आणि आख्यायिका आहे.

    घटस्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करून ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी घट बसवले जातात सर्व समाजातील बहुतांश भाविक श्रद्धेने तेल,तूप उडीदाची डाळ,गहू,साखर,गुळ दान देत असतात लहान मुलांचे जावळाचा ही कार्यक्रम होतो. घटस्थापनेपासून येथील व परिसरातील कोसगाव,दुसखेडा, पाडळसे,बामणोद,विरोदा, कासवा,कठोरा,म्हैसवाडी,रिधोरी,मांगी,करंजी या गावातील परिसरातील अनेक भाविक श्रद्धेने सढळ हाताने मदत करतात व कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःला वाहून घेतात.अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आश्‍विन शुद्ध अष्टमी यावर्षी दि.14 ऑक्टोबर21गुरुवार रोजी येत असल्याने महापूजा करण्यात येणार आहे व covid-19 चे संकट लक्षात घेता यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे

    तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी रात्री 15आक्टोबर21रोजी शुक्रवारी सकाळी देव काठी नऊ वाजता संध्याकाळी12गाड्या ओढल्या जातील.अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी वाजत गाजत भगत जुन्या साईबाबा मंदिरावर जातो तिथून आल्यानंतर पूजा झाल्यावर रात्री आठ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो तो रात्री एक ते दोन वाजे पावेतो सुरू असतो या महाप्रसादाचा मध्ये भाविकांना पोटभर प्रसाद दिला जातो त्यात पोळी खिर गंगा फळाची भाजी व उडदाचे डाळीचे वडे हे वीस ते पंचवीस हजार भाविकांसाठी पुरेल एवढा प्रसाद या ठिकाणी केला जातो.

    या कार्यक्रमास भाविकांनी दर्शन शिस्तीने रांगेत covid-19 चे नियम पाळून घ्यावे आणि संस्थांतर्फे यावेळी सॅनिटायझर वगैरे याचा वापर करण्यात येणार आहे भाविकांनी महाप्रसाद या वर्षी रद्द असल्यामुळे रात्री कोणीही गर्दी करू नये या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक आणि फैजपूर पोलीस स्टेशन चा स्टॉप बंदोबस्तासाठी उपलब्ध राहणार आहेत असे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मंदिराचे ट्रस्टी हिरालाल भाऊ व्‍यंकट चौधरी व या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थ माहिती दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yavala : जिनिंग प्रेस व्यापारी संकुलना समोरील रस्त्याची दुरावस्था

    December 24, 2025

    Yavala : बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

    December 24, 2025

    New Educational Policy : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नागरिक बनवेल

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.