वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी महिलांचा अभ्यास दौरा

0
43

जळगाव, प्रतिनिधी । वनपट्टे धारक (IFR) आदिवासी शेतकरी महिलांच्या क्षमता बांधणीतून “समृद्ध शेती-समृद्ध जीवन” प्रकल्पांतर्गत चेतना विकास संस्था , आलोडी वर्धा येथे आयोजित वनपट्टे धारक गांव कार्यकर्ती महिला शेतकरी यांच्या अभ्यास सहलीला मा. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात लोकसमन्वय प्रतिष्ठान संस्था शेती संदर्भात सातपुडा पर्वत रांगान मधील आदिवासी क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते.

सन २०२१-२२ ते २०२३-२०२४ या ३ वर्षांच्या कालावधीत Motivation for Excellence (MFE) मुंबई यांच्या आर्थिक सहाय्यातून नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील ३० गावांमधील आदिवासी कुटुंबातील महिला शेतकऱ्यांसोबत त्यांच्या शेतीविषयक कौश्यल्यांमधे सुधारित तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती तसेच त्यांची डोंगर उतारांव्रील शेतीत फळबागलागवड, सिंचन , बियाणे व खते यांचे नियोजन या सारख्या विषयांवर मार्गदर्शन व डेमोप्लॉट यांच्या माध्यमातून समृद्ध शेती प्रकल्प राबवीत आहोत.

या प्रकल्पांतर्गत या ३० गावान मध्ये एकूण ४० गांव कार्यकर्ती (CRP) यांची निवड केली आहे ज्या गावातील इतर महिला शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करतील या महिला गांव कार्यकर्ती शेतकरी प्रतिनिधींची समृद्ध शेती विकास संदर्भात वर्धा जवळील आलोडी येथील डॉ. अशोक बंग यांच्या चेतना विकास या प्रसिद्ध शेतीविकास विषयक संस्थेत एक्सपोजर व्हिजीट (अभ्यास सहल) दि. २७ /१२ /२०२१ ते २९/ १२ /२०२१ दरम्यान आयोजित केली आहे.

या सहकीची सुरुवात आज सकाळी जळगांव येथून काव्यरत्नावली चौकातून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, सचिन धांडे तसेच लोकसमन्वय प्रतिष्ठान चे संजय महाजन, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, फारुख शेख ,दामू भारंबे, पूजा पाटील, नीता पाडवी, तूर्शा वळवी,लक्ष्मी तडवी, दीलवर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here