जळगाव ः प्रतिनिधी
अनेक दशकांपासून स्व. नारायण अप्पा सोनावणे यांच्या प्रेरणेने सुरू असलेली ग्राम पंचायत बिनविरोधची परंपरा याही वर्षी जि.प.चे गटनेते व यावल तालुका काँंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनावणे यांंच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या सहयोगाने अबाधित राखली आहे. जिल्ह्यातील पहिली ग्रामपंंचायत काँग्रेसच्या खात्यात बिनविरोध करुन इतिहास रचला आहे.
राज्यात काँग्रेसच्या सहभागाने आघाडी सरकार अस्तित्वात असले तरी जिल्ह्यात पक्षाची परिस्थीती अतिशय हलाखीची आहे. अशाही परिस्थितीत एक आमदार, चार जिल्हा परिषद सदस्य , मोजक्या सहकारी संस्था या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्ते, नेते मंडळींनी पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
त्यात यावल तालुक्यातील वढोदे गाव हे पारंपरिक काँगेस विचारांनी प्रेरित असलेलं जी प गटनेते व काँग्रस कमिटी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनावणे यांचे गाव. येथेही ग्राम पंचायत निवडणूक होवू घातली आहे.मात्र या गावाने अनेक वर्षांपासून सुरू असलेली बिन विरोधाची परंपरा याही वर्षी अबाधित राखली आहे. सात सदस्य आसलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत ६ सदस्य बिन विरोध झाले तर १ जागा तांत्रिक कारणाने बिनविरोध होण्यास अडचण आली.