मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
मतदार संघातील वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड व वढोदा वनक्षेत्रातील वनविभागाची तसेच सामाजिक वनिकरण अंतर्गत येणारी विविध विकास कामे गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे रखडलेली होती.
प्रलंबित विकास कामांना तात्काळ मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा तसेच बहूप्रतिक्षेत असलेल्या वढोदा व्याग्र प्रकल्प अशा प्रमुख मागण्यांसंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी वनमंत्री राठोड यांनी मतदार संघातील विविध विकास कामे आणि व्याग्र प्रकल्प आदींबाबत अनुकूल असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.