Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»लोकशाही समृद्ध करण्यासह ती जपण्याकरिता कटिबद्ध होऊया : महापौर सौ.जयश्री महाजन प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमाप्रसंगी जळगावकरांना भावनिक आवाहन
    जळगाव

    लोकशाही समृद्ध करण्यासह ती जपण्याकरिता कटिबद्ध होऊया : महापौर सौ.जयश्री महाजन प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमाप्रसंगी जळगावकरांना भावनिक आवाहन

    saimat teamBy saimat teamJanuary 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : लोकशाही ही एक जीवन पद्धती असून, तो एक राज्यघटना व राज्यव्यस्थेचा प्रकार आहे. भारतात सर्वच निवडणुका या मुक्त, पारदर्शक व निर्भीडपणे पार पाडण्याकरिता लोकशाही समृद्ध करण्यासह ती जपण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध व्हायला हवे, असे भावनिक आवाहन जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी केले.

    प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेतर्फे काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी महापालिका आवारात आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते पार पडला, याप्रसंगी त्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून लोकशाही म्हणजे नेमके काय? यासंदर्भातील उलगडा करताना बोलत होत्या. महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त सौ.विद्या गायकवाड, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त श्री.श्याम गोसावी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांच्यासह सर्व विभागांचे उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी, तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरूवातील महापालिका अग्निशमन विभागाच्या मुख्य अधिकार्‍यांनी मानवंदना दिली. त्यानंतर जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन अग्निशमन विभागाच्या संचलनाची महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी यांच्यासमवेत पाहणी केली. याचवेळी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी तमाम जळगावकरांसह सर्व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. याचवेळी त्यांनी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान लोकशाही पंधरवडा साजरा करताना याअंतर्गत राबविण्याच्या विविध उपक्रमांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी तंतोतंत करण्याची सूचना उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांना केली. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

    मेहरुणमधील श्रीराम विद्यालयात ध्वजवंदन
    मेहरुण परिसरातील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री.पन्नालाल लाडवंजारी यांनी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थेच सचिव श्री.अशोक लाडवंजारी, सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

    मेहरुण परिसरातील संस्कृती विद्यालयात ध्वजवंदन
    मेहरुण परिसरातील संस्कृती माध्यमिक विद्यालयात काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी जय दुर्गा ग्रुपचे सचिव श्री.ललित धांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री.ज्ञानेश्वर नाईक, जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अनिल पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.