जळगाव प्रतिनिधी :- स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागण्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात यापुढे लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाच्या भीतीपोटी कोणीही पुढे येत नसताना कंत्राटी स्वरूपात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आया, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांच्या समर्पित त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला आहे.या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणांच्या निनादात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी मार्गदर्शन केले.
आंदोलनात अमोल कोल्हे,निलेश बोरा,रमेश सोनवणे,प्रा.प्रीतीलाल पवार, दिलीप सपकाळे, एच.एच. चव्हाण,युवराज सुरवाडे, कुंदन माळी,प्रतीक्षा सोनवणे, दिपाली भालेराव, सोना सुरवाडे, शिला सपकाळे, मंदाकिनी विंचुरकर, ललिता पवार, ऐश्वर्या सपकाळे, पूनम जाधव, यशोदा कार्लेकर, टिना बिऱ्हाडे, भाग्यश्री चौधरी, जगदीश सपकाळे ,सचिन बिऱ्हाडे,चंद्रशेखर पाटील, प्रथमेश नवले, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, निशांत नवले, सागर पाटील, मिलिंद तायडे, दत्तात्रय जोशी, सुधाकर सपकाळे, सागर पाटील, समाधान सोनवणे, संतोष ताडे, वाल्मीक सपकाळे, मिलिंद तायडे, उमाकांत विसपुते, बळीराम सपकाळे,जीवन बाऱ्हे, गौतम सपकाळे, दीपक बाविस्कर,समीर सोनवणे, हरीश अंभोरे, दीपक बाविस्कर, सतीश सुर्वे, धनलाल चव्हाण,कुंदन तायडे,गोकुळ बारी,रामकृष्ण सपकाळे,देवानंद सोनवणे,उमाकांत विसपुते,किरण माळी,रवींद्र चव्हाण,प्रशांत नेवे, रवींद्र पाटील, अमोल बाविस्कर, आकाश सपकाळे, प्रशांत कोळी,सुनील परदेशी,गोपीचंद कोळी,अजय सैंदाणे, शुभम पाटील यांच्यासह महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,संविधान जागर समिती,छावा मराठा युवा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आधीच संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, मनोज वाणी, मिलींद सोनवणे, खानदेश माळी महासंघाचे अध्यक्ष मुरलीधर महाजन, समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रताप महाजन, गजानन महाजन यांनी कोरोना योद्धयांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.