जळगाव ः प्रतिनिधी
लेवा पाटील समाज मंडळ जळगावच्यावतीने वधू-वर पुस्तक प्रकाशन काल रोजी मान्यवरांच्या उपस्थितित उत्साहात झाले.यावेळी मंचावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, आ .राजुमामा भोळे,मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे,जळगाव समाज मंडळ अध्यक्ष हेमंत भंगाळे, नितीन धांडे, मीनाक्षीताई धांडे,नगरसेविका महिला समाज मंडळ अध्यक्षा निताताई वराडे,दिनेश भंगाळे, दीपकभाऊ धांडे,कडु पाटील चितोडा,मराठा समाज अध्यक्ष संजय मराठे,नगरसेवक जितेंद्र मराठे,प्रकाश वराडे, ज्येष्ठ पत्रकार वसंत कोलते,शिशिर भंगाळे,किशोर कोलते, युवा अध्यक्ष कमलाकर वारके, तुषार वारके आदी उपस्थित होते.
तोतराम महाराज नवचैतन्य या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हेमंत भंगाळे यांनी प्रास्ताविक करतांना शेतकरी आणि व्यवसाय करणार्या उपवर मुलांना वधू मिळणे अवघड झाले आहे. अशा मुलांसाठी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील उपवर मुलींचा शोध घेऊन त्या मुलींची आपल्या समाजातील मुलांशी सोयरीक जमविण्याचा प्रयत्न असून लवकरच असे किमान १० विवाह होतील असे सांगितले. समाजात प्रबोधन करणारे कार्यक्रम घेण्यासाठीचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ऍड. रोहिणीताइ खडसे म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात संघर्ष अटळ असतो, नाथाभाऊंनी केलेलाा संघर्ष सर्वश्रुत आहे. जळगाव समाज मंडळाला सर्वोतपरी सहाय्य करु अशी ग्वाही दिली.
तर आ. राजूमामा भोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात या मंडळाला सहाय्य करण्यासाठी बांधिल आहे.मंडळाने राबविलेल्या उपक्रमांची प्रशंसा करून असे कार्यक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधूवर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी सोशल डिस्टिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितिन भोळे ,अशोक भारंबे , धर्मराज देवकर,.बाबू भंगाळे ,प्रशांत महाजन,हेमराज वराडे,सीमाताई फेगडे, पूनमताई सावदेकर, देवयानीताई कोलते,स्वप्नील खडसे, चेतन कोलते भुसावळ,रविंद्र पाटील,ललित पाटील ,विशाल सुतार,पवन कोलते,मयूर लोखंडे,निलेश वारके,सुपडु महाजन, गणेश भंगाळे,गणेश धांडे,गणेश पाटील,विष्णु खडसे,नरेंद्र लोखंडे,सोपान कोलते यांनी परिश्रम घेतले.