लिहित्या हातांना पुरस्काराने मिळते ऊर्जास्वर्गीय- डॉ.तेजपाल चौधरी

0
39

जळगाव ः प्रतिनिधी
लिहित्या हातांना ऊर्जा देण्याचे काम पुरस्कारांच्या माध्यमातून होते.वर्तमानात वाङ्मयात नवनवे विषय हाताळले जाताहेत.समाजाच्या वेदनेचा तळ शोधण्याचा प्रयत्न नवी पिढी करते आहे. वाचन, चिंतन, लेखन, मननाची प्रक्रीया साहित्यविषयक उपक्रमातून गतिमान होत आहे, असे मत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक प्रा. डॉ. तेजपाल चौधरी यांनी येथे व्यक्त केले.श्री गजानन हार्ट अ‍ॅण्ड आय हॉस्पिटलच्या सहकार्याने यंदापासून साहित्यविषयक पुरस्कार सुरू करण्यात आले. मनोज बोरगावकरांच्या …नदिष्ट…ला स्वर्गीय दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी तर संदीप शिवाजीराव जगदाळेंच्या …असो आता चाड…ला स्वर्गीय गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला होता.या दोन्ही पुरस्कारांचे वितरण शनिवारी करण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसन पाटील, कवी शशिकांत हिंगोणेकर, ज्येष्ठ कवी बाळकृष्ण सोनवणे, प्रा.रविंद्र पाटील, पुरस्कारार्थी मनोज बोरगावकर (नांदेड), संदीप दगदाळे (पैठण), हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विवेक चौधरी, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, कल्पना चौधरी,डॉ. अंजली चौधरी, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांची उपस्थिती होती.
मान्यवरांचे विचार
याप्रसंगी बोलतांना मनोज जगदाळे म्हणाले की, कवींनी केलेल्या नेतृत्वातून अनेक वैचारिक, सामाजिक क्रांती घडल्या.कवीने धोका पत्करून लिहीले पाहिजे.सामाजिक पुनरुत्थानाची चळवळ प्रवाहीत ठेवण्यासाठी कुठलाही आडपडदा ठेवून लिहायला हवे.कादंबरीकार मनोज बोरगावकर म्हणाले की, संस्कृती वंचीत लोकांनी खर्‍या अर्थाने जपली आहे. निसर्गाच्या एवढी संवेदनशीलता मानवाकडे नाही. तृतीयपंथीयांचा चिकित्सक अभ्यास करणे ही समाजाची नैतीक जबाबदारी आहे .प्रा. डॉ. किसन पाटील म्हणाले की, स्वर्गीय कवी गणेश चौधरी, दिवाकर चौधरी हे विचारांनी समृद्ध होते. त्यांचं शरीर जरी वेगळं असलं तरी मन एक होते. गणेश चौधरींचे काव्य व दिवाकर चौधरी यांची कांदबरी लेखनाची शैली हेवा वाटावा अशीच होती.कवी शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की, दर्जेदार साहित्यकृतीला पुरस्काराने सन्मानित केल्याने लिहिणार्‍याला बळ मिळते. जिल्ह्यासह खान्देशात साहित्यविषयक चळवळ प्रवाहीत ठेवण्यासाठी चौधरी परिवाराने हे दोन्ही पुरस्कार निरंतर सुरू ठेवावे. जेणेकरून नवोदितांना लिखाणाची ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकेल.प्रास्ताविक डॉ. विवेक चौधरी यांनी केले. प्रा. महेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here