लाभकारी मुल्य शेतकऱ्यांना मिळावे म्हणून भारतीय किसान संघ करणार आंदोलन

0
30

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर भारतीय किसान संघाच्या माध्यमातून लाभकारी मुल्य शेतमालाला मिळावे म्हणून धरणे आंदोलन दि.११ जानेवारी रोजी केले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला उत्पादनाधारीत तसेच शेतकऱ्यांचे कष्ट गृहीत धरून लाभकारी मुल्य प्राप्त व्हावे त्यासाठी सरकारने शेतकरी हितासाठी कायदा करावा म्हणून महामहिम राष्ट्रपतींना आग्रह करणेसाठी भारतीय किसान संघ दि.११ रोजी धरणे आंदोलन तहसील कचेरीवर केले जाणार आहे.या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने तालुका संपर्क प्रमुख गावागावात जावून या धरणे आंदोलनासाठी संपर्क करणार आहे.
त्यामुळे प्रत्येक तालुक्यात धरणे आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय किसान संघाचे प्रांत संघटक चंदन पाटील,प्रांत कार्यकारणी सदस्य प्रा.मनोहर बडगुजर,जिल्हा मंत्री डॅा.दिपक पाटील, कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे,प्रसिद्धी प्रमुख रामदास माळी कार्यकारणी सदस्य राहूल बारी, सुमित पाटील,राधेश्याम चौधरी, श्रीकांत श्रीखंडे,सौ.बडगुजर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here