लाकडी गणपती मंदिरात गणेश यज्ञ उत्साहात

0
44

जळगाव ः प्रतिनिधी
येथील बळीराम पेठेतील लाकडी गणपती मंदिरात गणेश जयंती निमित्त काल श्री गणेश यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी व गणेश भक्तांनी यज्ञाचा लाभ घेतला. या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, उपमहापौर सुनीलभाऊ खडके, स्वीकृत नगरसेवक राजु मराठे, होलसेल भाजीपाला विक्री संघटनेचे अध्यक्ष आत्माराम माळी , दिपक पाटील, प्रशांत माळी, राजू सोनवणे, विजय भाटिया, मिनेश दलाल, प्रीती कोठारी मॅडम, जमनदास भाटिया, अशोकआप्पा भाटिया, अविनाश नेवे, धमेंद्र डाकलिया, दिपक भाटिया इत्यादी मान्यवरांनी लाभ घेतला.
तसेच या प्रसंगी गणेश यज्ञ व महापूजेचा मान दिपक भाटिया आणि शितल भाटिया यांना मिळाला.अरुण मु. नेवे व त्यांचे सहकारी यांनी गणेश भक्तीपर गीते व भजन सादर केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शोभा भाटिया, ललिता आशर, शितल भाटिया, नमिता सोनी, जानव्ही अशर, भूमि भाटिया, हितश्री भाटिया, मिठी भाटिया यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here