रोटरी सेंट्रल,प्रभाकर अ‍ॅकेडमीतर्फे वृद्धाश्रमात रंगले ‘भक्तिरंग जेष्ठांसंग’

0
64

जळगाव : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि प्रभाकर कला संगीत अ‍ॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथे आजी-आजोबांसाठी ‘भक्तिरंग जेष्ठांसंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्तिक महिन्यातील जळगावच्या रथोत्सव अर्थात लोकोत्सवाचे औचित्य साधून ज्येष्ठ व्यक्तींसाठी अभंग-भजन यावर आधारीत नृत्यसंगीत यांची ही मैफील होती.कार्यक्रमात अयगिरी नंदिनी महिषासुर मर्दिनी स्त्रोत, कृष्ण भजन, मधुराष्टक्रम, सुंदर ते ध्यान, मिरा भजन,ध्यान लागले रामाचे, चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी, अबीर गुलाल उधळीत रंग, अवघे गर्जे पंढरपूर, आदि अभंग व भजनांवर मधूरा इंगळे, वाग्मयी देव, श्रावणी उपासनी,दिपीका घैसास, मृण्मयी कुळकर्णी, हिमानी पिले, ऋतुजा महाजन,राधिका सरोदे यांनी कथ्थक नृत्य सादरीकरण केले. सूत्रसंचालन अपूर्वा दामले हिने तर प्राजक्ता वैद्य यांनी आभार मानले.
प्रारंभी आनंदाश्रमातील एक आजी व आजोबा यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले.अध्यक्षा प्रा.डॉ.अपर्णा भट-कासार यांनी प्रास्ताविकात भूमिका विषद केली.कार्यक्रमास रोटरी सेंट्रलचे मानद सचिव जितेंद्र बरडे, माजी अध्यक्ष विष्णू भंगाळे,महेंद्र रायसोनी, श्रीओम अग्रवाल, महेंद्र गांधी, दिलीप लुणिया, किर्ती जैन, आनंद दामले, जी.आर. चौधरी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या गांधी,मीना लुणिया,साधना दामले, डॉ.विद्या चौधरी,वरद वैद्य व मातोश्री आनंदाश्रमाच्या छाया पाठक आदिंची उपस्थिती होती.
अवतीभवती असलेल्या आजच्या वातावरणात या भक्ती रंगामुळे सादरीकरण करणार्‍या विद्यार्थीनी आणि आनंदाश्रमातील आजी-आजोबा यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.यशस्वीतेसाठी रोटरी सेंट्रलच्या सांस्कृतिक समिती सदस्य व प्रभाकर कला संगीत अ‍ॅकेडमीचे सहकारी यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here