जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे शिरसोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना मास्क आणि ग्लोजचे वितरण करण्यात आले.रोटरी सेंट्रलचे सदस्य राजेंद्र पिंपळकर यांचे यासाठी सहकार्य लाभले.
कार्यक्रमास अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासर, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल, आरोग्य सेवक निलेश चौधरी,अनिल महाजन, आरोग्य सेविका रेणुका आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी क्लब जळगावतर्फे चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
जळगाव – येथील रोटरी क्लब जळगावतर्फे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोहाडी येथील शासकीय रुग्णालयास चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या. चारही मशीनचे प्रायोजकत्व रोटरीचे जेष्ठ सदस्य कंवरलाल संघवी यांनी स्वीकारले होते. यापूर्वी रोटरी क्लब जळगावतर्फे दोन ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या असून त्यातील एका मशीनचे प्रयोजकत्व रोटरी सदस्य प्रेमशंकर अग्रवाल यांनी स्विकारले होते. कार्यक्रमास रोटरी अध्यक्ष जितेंद्र ढाके, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.जयंत जहागिरदार, आसिफ मेमन, सेवारथ संस्थेचे दिलीप गांधी,वर्धमान संघवी व युसूफ भारमल यांची उपस्थिती होती.