Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रोटरी वेस्टच्या वर्धापन दिनी रक्तदान, लसीकरण नवीन ऑक्सीजन सिस्टिम्सचे लोकार्पण
    जळगाव

    रोटरी वेस्टच्या वर्धापन दिनी रक्तदान, लसीकरण नवीन ऑक्सीजन सिस्टिम्सचे लोकार्पण

    saimat teamBy saimat teamMay 3, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या २८ व्या वर्धापन दिनी रक्तदान शिबीर, लसीकरण मोहीम, नवीन ऑक्सिजन सिस्टीम्सचे लोकार्पण आणि मातोश्री आनंदाश्रमात फळे व किराणा साहित्याचे वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
    मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी वेस्ट तर्फे कोरोना काळातील चौथे रक्तदान शिबीर रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. त्यात ४० पेक्षा अधिक व्यक्तींनी रक्तदान करुन सहभाग घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण मोहीम ही राबविण्यात आली.
    रोटरी वेस्ट तर्फे मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात ५० बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी रोटरी वेस्ट परिवारातील सौ.चेतना सतरा यांनी १ लाख ४५ हजार रुपयांचे योगदान दिले. रोटरी वेस्टने या रुग्णालयात यापूर्वी ७५ बेडससाठी ही सुविधा निर्माण करुन दिली आहे. मातोश्री आनंदाश्रमातील व्यक्तींसाठी १५ ते २० दिवस पुरतील या प्रमाणात फळे व किराणा साहित्याचे वर्धापन दिनानिमित्त वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष गनी मेमन, डॉ. राजेश पाटील, विनोद बियाणी, अनंत भोळे, चंद्रकांत सतरा, अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, कुमार वाणी, सुनील सुखवाणी, अनुप असावा, प्रविण जाधव, विवेक काबरा, सागर पाटील, दिग्वीजय पाटील, सरिता खाचणे, देवेश कोठारी, विजय शामनानी, महेश सोनी, मुनीरा, तरवारी, कपील शहा, शंतनू अग्रवाल, धीरज फटांगळे, अमृत मित्तल आदि सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : तरुण मजुराचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : कर्जबाजारी शेतकऱ्याची विषप्राशनातून आत्महत्या

    February 14, 2026

    Jalgaon : साई गजानन रेसिडेन्सीतील १८ दुचाकी जळून खाक माथेफिरूच्या कृत्याचा संशय

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.