जळगाव ः प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत रिंगरोडवरील डॉ. शिरीष चौधरी यांच्या आस्था हॉस्पीटल येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात दुभंगलेले ओठ, टाळू, टाळूला शस्त्रक्रियेनंतर राहिलेले छिद्र, तिरपे राहीलेले नाक व्यवस्थीत करणे, आवाज व्यवस्थीत करण्यासाठी शस्त्रक्रिया व या संबंधीत सर्व समस्यांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरज असलेल्या सर्व रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी भूल देणे, औषधी, रक्त तपासणी पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांची राहण्याची व जेवणाची सुद्धा निःशुल्क सुविधा देण्यात येणार आहे.रुग्णांना येण्या-जाण्याचे भाडेदेखील आयोजकांतर्फे देण्यात येणार असल्याची माहिती रोटरी गोल्डसिटीचे प्रकल्प प्रमुख डॉ. दीपक अटल यांनी दिली.
कोरोना विषयी सर्व शासकीय सूचना व नियमांचे पालन करुन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सहकार्य व प्रांतपाल शब्बीर साकीर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबीरासाठी पूर्व नाव नोंदणी डॉ. शिरीष चौधरी, आस्था प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी सेंटर, बँक ऑफ इंडियासमोर, रिंगरोड, जळगाव फोन०२५७-२२३२१८२ येथे करावी आणि शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विनायक बाल्दी, मानद सचिव सुनिल आडवाणी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.