चोपडा ः प्रतिनिधी
कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब चोपडाने ३ ऑक्सिजन कॉन्ेसंट्रेटर मशीन २३ एप्रिल २०२१ पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे.
चोपडा शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे.जे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना हे कॉन्संट्रेटर ऑक्सिजन मशीन मिळू शकणार आहे. यावेळी प्रांत शिंदे व तहसीलदार अनिल गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी अध्यक्ष नितिन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, पुनम गुजराथी, डॉ.ललित चौधरी, एम.डब्लू.पाटील,अरुण सपकाळे, महेंद्र बोरसे सर,प्रफ्फुल गुजराथी,प्रविण मिस्त्री,चंद्रशेखर साखरे,सुनिल महाजन, अर्प्रित अग्रवाल, पंकज बोरोले, चेतन टाटिया उपस्थित होते.
विजेवर चालणारे हे मशिन हवेतून आणि पात्रतामधून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे.मिनिटाला ५ ते १० लिटर्स इतका ऑक्सिजन पुरवठा करता येवू शकतो.सद्यस्थितीत हे मशिन कोरोना रुग्नांसाठी वरदान ठरत आहे.बाहेर वाढलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती व टंचाई पाहता व वापरण्यास सोपे असल्याने हे मशिन उपयुक्त आहे.
शरिरातील ऑक्सिजनची पातळी ९० ते ९२ टक्क्याच्या खाली आल्यावर ऑक्सिजन सपोर्ट लागतो.डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा रुग्णांना ह्या मशिनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करता येईल.काही रुग्ण कोविडमधून बरे झाल्यानंतरही त्यांना कित्येक महिने ऑक्सिजन ची गरज भासते.अशा होम आयसोलेशनच्या रुग्णांसाठी हे मशिन फारच उपयुक्त ठरत आहे.
गरजु रुग्णांनी यमुनाई हॉस्पिटल,समर्थ पॅलेस समोर,यावल रोड येथील रोटरी क्लबच्या रुग्णसेवा या ऑर्थोपेडिक लायब्ररी येथे मोबाईल नं.८०८७६ ७१२१६, ९८२३३५५५९९ वर संपर्क करावा असे आवाहन चोपडा रोटरी क्लबकडून करण्यात आले आहे.