जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे एमआयडीसीतील महावीर नीरज इंडस्ट्रीज येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात अाले. यात सुमारे १०० दात्यांनी रक्तदान केले.
शिबिरात महावीर पॅकेजिंगच्या कामगारांसह रोटरी गोल्डसिटीचे सदस्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद््घाटन उद्योजक श्रीराम पाटील व रोटरीचे माजी उपप्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेश पाटील यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले. श्रीराम पाटील यांनी कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील सहयोगी असल्याचे म्हटले. शिबिरासाठी अध्यक्ष उमंग मेहता, सचिव डॉ. नीरज अग्रवाल, प्रकल्प प्रमुख सुमीत छाजेड, सुमीत छाजेड, डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, राकेश सोनी, सौरभ पटनी, प्रखर मेहता, राहुल कोठारी, डॉ. अर्चना कोतकर यांनी सहकार्य केले.