रोटरी क्लब,नॅबतर्फे अंध बांधवांनावस्तू वाटप

0
17

जळगाव ः प्रतिनिधी
रोटरी क्लब जळगाव आणि नॅब असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेल लुई यांच्या जयंती निमित्ताने ३० अंध बांधवांना वस्तू स्वरूपात भेट देण्यात आली.या प्रोजेक्टचे संपूर्ण प्रायोजकत्व डॉ. तुषार फिरके आणि श्रीमती मीनल पाटील यांनी स्वीकारले.
यावेळी नॅबचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, डिस्ट्रीक्ट सहसचिव डॉक्टर तुषार फिरके,नॉन मेडिकल कमिटी चेअरमन योगेश गांधी ,कॅप्टन मोहन कुलकर्णी ,संदीप शर्मा, योगेश चौधरी ,श्रीमती मीनल पाटील,अरविंद नारखेडे, सुनील दापोरेकर, उल्हास भोळे,जयंत पाटील उपस्थित होते सूत्र संचालन सी.डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अजित वाघ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here