जळगाव, प्रतिनिधी । रिक्षाचालक, मालकांनी बुधवारपासून व्यवसाय करीत असताना गणवेश, कागदपत्र साेबत ठेवावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या आहेत.
शहरात अनेक रिक्षाचालक भाडेतत्त्वावर रिक्षा घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मूळ कागदपत्र नसतात. गणवेश परिधान करीत नाहीत. नेमून दिलेल्या स्टॉपवर रिक्षा उभी करीत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात असे निदर्शनास आल्यामुळे वाहतूक शाखेने सूचना जारी केल्या आहेत. बुधवारपासून नियम मोडणाऱ्या रिक्षाचालक, मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे वाहतूक शाखेतर्फे कळवण्यात आले आहे.