राष्ट्रीय मतदार दिनी नव मतदारांना ओळखपत्राची भेट…..सोयगाव तहसील कार्यालयाचा उपक्रम…..

0
7

   सोयगाव : प्रतिनिधी (विजय चौधरी )

१२ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुका निवडणूक विभागाकडून ६४० नव मतदारांना ओळखपत्राची अनोखी भेट दिली आहे.सोयगाव तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून हि कार्यवाही करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून मंगळवारी सोयगाव तालुक्यात मतदान केंद्रांवर बारावा मतदार दिन साजरा करण्यात आला यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या नव मतदारांना ओळखपत्र भेट घरपोच देण्यात आली.यामध्ये सोयगाव तालुक्यात ९६ मतदान केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.तहसीलदार रमेश जसवंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे,अव्वल कारकून सुधीर जहागीरदार,सचिन ओहोळ आदींनी हा उपक्रम राबविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here