यावल : तालुका प्रतिनीधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील न्हावी व यावल येथे ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून डिलेवरी वार्ड लेबर रूम,वेटिंग रूम,स्टोर रुम इत्यादी खोल्यांचे बांधकाम सुरू आहे.बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर किंवा संबंधित शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी राहत नसल्याने बांधकाम रामभरोसे सुरू आहे, तसेच बांधकामा बाबत माहिती सुद्धा मिळू शकत नाही,बांधकाम कोणत्या योजनेतून किती लाखाचे आहे? इत्यादी माहिती फलक बांधकामाच्या ठिकाणी न लावल्यामुळे यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात वरील योजनेअंतर्गत जे बांधकाम काम सुरू आहे त्यातील पिलर चे खड्डे फक्त ४ फूट खोल अंतराचे केले आहेत तर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पिलर साठी ७ फूट खोल अंतराचे खड्डे खोदण्यात आले आहेत.एकाच विभागाअंतर्गत तसेच योजनेमध्ये डिलेवरी वार्ड लेबर रूम, स्टोअर रूम,वेटिंग रूम,बांधकामात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्लॅन इस्टिमेट करण्यात आले आहे का? बांधकामाच्या ठिकाणी बांधकामाबाबत संबंधित विभागाने ठेकेदारामार्फत बांधकाम माहितीबाबत फलक का लावलेला नाही?बांधकाम मंजूर प्लॅन,नकाशा, इस्टिमेट प्रमाणेच होते आहे किंवा नाही याची देखरेख करण्यासाठी कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचा सुपरवायझर किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत संबंधित अधिकारी किंवा बांधकाम शाखा अभियंता उपस्थित राहत नसल्याने यावल व न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयातील बांधकाम राम भरोसे सुरू असल्याचे तसेच बांधकामाचे ठेके १५ ते २० टक्के ’बिलो’ आहेत की ’लो’आहेत?आणि संबंधित ठेकेदार भावसार नामक असल्याचा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत कार्यालयात सुद्धा भावसार नामक एक कर्मचारी असल्याच्या योगायोग सुद्धा यावल तालुक्यात सर्वत्र चर्चिला जात आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी सदरचे बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणित होते आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष खात्री करून कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.