जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सहकार सेल सुरू केले असून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सेल ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी सहकार विभागाची निर्मिती झाली अाहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे काम महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. सहकार क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी सहकार विभाग कार्यान्वित झाला अाहे. या विभागाकडे शरद पवार लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींना जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक तसेच नियोजन मंडळाचे सदस्य वाल्मीक पाटील यांची नियुक्ती झाली. पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकार विभागाचे प्रदेशाध्यक्ष डी. वाय. पगारे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले.