जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडीची स्थापना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील तसेच महानगर सचिव कुणाल पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे स्थापित करण्यात आली.हेमंत सोनार (महानगर अध्यक्ष), प्रवीण धनगर (महानगर सचिव), मनोज भालेराव(महानगर कार्याध्यक्ष), सागर पाटील (महानगर सरचिटणीस), सुनील दाभाडे (उपाध्यक्ष), प्रवीण पाटील (उपाध्यक्ष), अनिल शेलकर (उपाध्यक्ष), विजय विसपुते (उपाध्यक्ष), विजयसिंग पाटील ( सहसचिव), पांडुरंग पवार (सहसचिव), पंकज सूर्यवंशी (सहसचिव), मनोज बावस्कर (सहसचिव), मुरलीधर कोळी (सहसरचिटणीस) अशा पद्धतीने कार्यकारणी गठीत करण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षकांच्या समस्यावर चर्चा करण्यात आली.