जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला महानगरच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आदर्श शिक्षीकांचा सत्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षीकांचा सन्मान व सत्कार जिल्हा बँकेचे मा अध्यक्ष गुलाबराव देवकर व जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरोज तिवारी मुख्याध्यापिका, अश्विनी रावसाहेब साळुंखे, ज्योती लक्ष्मण पाटील, नीता शैलेश पाटील, दीप्ती चंद्रकांत नारखेडे, उज्वला विलास पवार, वर्षा प्रकाश गवळी, धारा ठक्कर आदी शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, शालिनी सोनवणे, कल्पिता पाटील, मीनाक्षी चव्हाण, ललित बागुल, सुमन बनसोडे, रुपाली पाटील, शैला पाटील, रुपाली भामरे, तासमीन तडवी, कलाबाई शिरसाठ, वर्षा राजपूत, उज्ज्वल पाटील, दिलीप माहेश्वरी, सुनील माळी आदी उपस्थित होते.