Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना करोनाची लागण
    मुंबई

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना करोनाची लागण

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

    करोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये असल्याचे समजते.

    गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत करोना परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार मैदानात उतरताना दिसले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य सचिवांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी करोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बराच काळापासूनच सुरु असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठीही शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सोबत घेऊन एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याशिवाय, शरद पवार राज्यातील करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कातही होते.

    I have tested Covid positive but there is no cause for concern. I am following the treatment as suggested by my doctor.
    I request all those who have been in contact with me in the past few days to get themselves tested and take all necessary precautions.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022

     

    मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत घट

    मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत रविवारी २ हजार ५५० नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ३३ हजार ९१५ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ५३५ इतकी आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    MPSC Exam Postponed : एमपीएससीची मोठी उलटफेर! 21 डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा जाहीर

    December 8, 2025

    Split in the Grand Alliance : भाजप-शिंदे गट संघर्षात वाढ; २ डिसेंबरच्यानंतर मोठी हालचाल?

    November 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.