राष्ट्रवादीतर्फे स्वाभिमान सप्ताह, व्हर्च्युअल रॅली

0
44

जळगाव ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या ८० वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वाभिमान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
खासदार पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त १२ रोजी मुंंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे कांताई सभागृहात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाच्या आजी माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावले आहे. याशिवाय चाळीसगाव, रावेर, जळगाव यासह जिल्हाभरात रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर, वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात देखिल स्थानिक पातळीवर कार्यक्रम होणार आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने ग्रामीण भागात कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
१३ डिसेंबर रोजी जळगाावात नवीन २५ शाखांचे उद्घाटन केले जाणार असून प्रतिभावंत पुरस्कार देऊन महिलांना गौरविण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पारोळा येथील अन्यायग्रस्त महिलेच्या कुटुंबियांना २१ हजारांची मदत दिली जाणार आहे. १२ डिसेंबरला सकाळी ९ वाजता पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केले जाणार आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ८ हजार ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० रोजी चांदसर येथे वक्ता प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचे संजय पवार यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अरूण पाटील, दिलीप वाघ, मनिष जैन,अभिषेक पाटील,कल्पनाताई पाटील,मंगलाताई पाटील, वाल्मिक पाटील, मधु पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here