धरणगाव : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फळ वाटप करण्यात आले. तसेच पी.आर. हायस्कूल येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, डॉ. मिलींद डहाळे, तालुकध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सिताराम मराठे, गोपाल पाटील, भुषण पाटील, आनंदा पाटील, सागर वाजपाई, पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे, विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



