राष्ट्रवादीचा झेंडा फडकला ; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

0
71

नगर : सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कर्जत नगरपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे . या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने या नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपच्या पदरात दोन जागा पडल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाळेल्या दणदणीत विजयाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

 

कर्जत नगरपंचायतीवर भाजपची (BJP) सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी व्यक्त केला आहे. मात्र शिंदे यांचा हा दावा फोल ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जतच्या जनतेने पाहिली नाही , अशा शब्दात शिंदे यांनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता.

दापोली नगरपंचायत निकाल :
दापोली नगरपंचायतीत शिवसेनेला दोन आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचे आरिफ मेमन आणि नौशिन गिलगिले विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे खालिद रखांगे आणि मेहबूब तळघरकर यांनीही बाजी मारली .

अहमदनगर -अकोले नगरपंचायत निकाल –
प्रभाग 1- विमल संतु मंडलीक (शिवसेना) , प्रभाग 2- सागर चौधरी (भाजपा), प्रभाग 3-प्रतीभा मनकर (भाजपा), प्रभाग 4- इथेश कुंभार (भाजपा), प्रभाग 5- सोनाली नाईकवाडी (भाजपा) प्रभाग 6-_श्वेताली रूपवते (राष्ट्रवादी).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here