रावेर, तालुका प्रतिनिधी । तालुक्याचा केंद्रबिंदू म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जात असतांना रावेर पं.सं ची प्रतिमा मलिन करण्याचे काम पं.स.मध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभार सुरु ठेवल्यामुळे होत असतांना दिसून येत आहे. पं. सं च्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची गुणवत्ता घसरत असतानांही वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या शाखा अभियंत्याची पाठराखण करीत असल्याने पं. स. सदस्यांसह नागरिकांकडून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली जात आहे.एकंदरीत रावेर पं.स.चे शाखा अभियंते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओंजळीत असल्याचेही बोलले जात आहे.
या बाबत कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भोंगळ कारभार करणाऱ्या शाखा अभियंत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन या प्रकरणी सत्यता पडताळून पहावी अशीही अपेक्षा काही ठेकेदारांनी व पं.स. सदस्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे .
वरिष्ठ पातळीवर साखळी
शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता,कार्यकारी अभियंता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची देवाणघेवाणची साखळी असल्याने रावेर पं.स.मध्ये कार्यरत असलेल्या शाखा अभियंत्यांनी भोंगळ कारभाराचा कळस गाठला आहे. एक नैतिकता म्हणून वरिष्ठ अधिक़ाऱ्यांनी आपले कर्त्यव्य बजावीत या प्रकरणी सत्यता पडताळणी करावी अशीही रास्त अपेक्षा काही पंचायत समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे .