रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निराधार झालेल्या २५ महिलांना कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार उषाराणी देवगुणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नायब तहसीलदार सी.जी. पवार, संजय गांधी निराधार योजनेचे प्रभारी नायब तहसीलदार जी.एन. शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील मराबाई तायडे, अजनाड, धृपताबाई महाजन, आटवाडा, वामन वाघ, अभोडे बुद्रुक, दुर्गाबाई धनगर, लताबाई अटकाळे, अहिरवाडी, अनिसा तडवी, केर्हाळा खुर्द, जरीनाबी शेख अकील, खानापूर, वेलाबाई बारेला, गारखेडा, रेखाबाई झाल्टे, चिनावल, सायरा तडवी, जानोरी, वंदना पाटील, थेरोळे, कुसुमबाई सवर्णे, निंभोरासीम, कविता वाघ, नेहेता, आशाबाई चौधरी, पाडले खुर्द, भागीरथी कोळी, पातोंडी, सरला बाविस्कर, आशा तडवी, पाल, विजयाबाई लहासे, भोकरी, मंगलाबाई पाटील, शारदा वाघोदे, मोरगाव, यशोदाबाई पाटील, रोझोदा, संगीताबाई पाटील, विवरे खुर्द, पपिलाबाई शिरतुरे, शांताबाई भालेराव, विवरे बुद्रुक व प्रतिभा पाचपोळे, सावखेडा या २५ निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळाला.