रायसोनी महाविध्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
10

जळगाव : प्रतिनिधी   जी. एच. रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक महाविध्यालय व  रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या भव्य प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ललित पाटील या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाले कीविविधतेने नटलेल्या आपल्या देशातील नागरिकांना संविधानाने समान हक्क दिले आहेत. आपल्या लाभलेले हक्क व कर्तव्यांचा वापर देशहितासाठी करून शांततासमता व बंधुता ही मूल्ये जोपासावी व आपल्या हक्कांचा वापर करत असतांना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी असा मौलिक संदेश डॉ. अग्रवाल यांनी दिला. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बिपासा पात्रा व प्रा. रफिक शेख यांनी केले तर यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्यप्राध्यापकविद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here