रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाअंतर्गत “अभियांत्रिकी प्रथम वर्ष” स्वागत समारंभाचे आयोजन

0
36

जळगाव, प्रतिनिधी । आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताना आयुष्यातील आनंदही अनुभवावा, असे मनोगत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व विभागाच्या ‘आगाज’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढोद्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते. विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसाद कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते. करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होईल कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करताना पुरेपूर झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम याकडे ही लक्ष देणे गरजेचे असून मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये ही वेळोवेळी सहभाग घेत चला तुम्हाला निश्चित यश मिळेल असा यशाचा कानमंत्रच प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे समन्वय व सुत्रसंचालन महाविदयालयाच्या अॅडमिशन डीन प्रा. प्रिया टेकवाणी यांनी केले, तर महाविदयालयाच्या प्रा. मयुरी गजके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांनी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here