जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नवीन रायपूर येथे दि.१५ रोजी सात जागेसाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात असून त्यातून वार्ड १ मधून पुष्पबाई सिताराम परदेशी व उषाबाई दिलीप परदेशी तर वार्ड क्र.२ मधून रजनी नितीन सपकाळे हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
रायपूर येथे ७ जागेसाठी दि.१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तीन वार्ड असून वार्ड क्र.१ मध्ये ३ जागेसाठी लढत होत असून महिला राखीव मध्ये पुष्पाबाई सिताराम परदेशी या बिनविरोध विजयी झाल्या तर ओबीसी महिला राखीवमध्ये उषाबाई दिलीप परदेशी बिनविरोध विजयी झाल्या. तर वार्ड क्र.१ मध्ये सर्वसाधारण पुरुष जागेसाठी लढत होत असून मानसिंग खेमसिंग परदेशी, वसंत सिताराम धनगर, सुनिल जुलाल परदेशी यांच्यात सरळ लढत होत आहे. वार्ड क्र.२ मध्ये दोन जागेसाठी लढत होत असून यात एससी महिला राखीव असलेल्या जागेसाठी रजनी नितीन सपकाळे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर एका सर्वसाधारण जागेसाठी ताराबाई भिमसिंग परदेशी, संगिताबाई भिमसिंग परदेशी व शितल चेतन परदेशी यांच्यात सरळ लढत होत आहे. तसेच वार्ड क्र.३ मध्ये दोन जागेसाठी लढत होत असून यात ओबीसी पुरुष जागेसाठी रमेश रामा कोळी विरुद्ध प्रविण लक्ष्मण परदेशी यांच्यात लढत आहे. तर स्त्री राखीव जागेसाठी मंदाबाई संतोष परदेशी, मायाबाई विजयसिंग परदेशी व संगिताबाई अनिल इंगळे यांच्यात लढत होत आहेत. या निवडणुकीत कोणत्या वार्डात कोण बाजी मारतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.