रामानंदनगरात भरदिवसा चोरीचा प्रयत्न

0
52

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामानंदनगर परिसरातील जागृती हौसिंग सोसायटीमधील एका बंद घरात भर दुपारी चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या चोरट्यांच्या धाडसी प्रकारामुळे जिल्ह्यात पोलीसांचा धाक संपल्याची भावना जनतेमध्ये उमटू लागली आहे. तर चोरट्यांनी आता चक्क दिवसाढवळ्या पोलीसांसमोर आव्हान उभे केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामानंदनगर परिसरात जागृती हौसिंग सोसायटीमध्ये (प्लॉट नं.३१, गट नं १४८) हरसिंग पाटील हे आपल्या कुटुंबियासमवेत वास्तव्यास आहेत. काल २८ फेब्रुवारी रविवार असल्याने हरसिंग पाटील हे आपल्या परिवारासह कामानिमित्त खोटेनगर परिसरात राहणार्‍या आपल्या काकांकडे दुपारी २ वाजता गेले होते. जातांना त्यांनी आपल्या घरातील दरवाजाची कुलूपे व्यवस्थित नेहमीप्रमाणे लावून गेले होते. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबिय घरी परतले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घराचे सेफ्टी डोअर हे गॅस कटरचा वापर करुन तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून पाटील कुटुंबिय धस्तावले. सुदैवाने सेफ्टी डोअर न तुटल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. दरम्यान, हरसिंग पाटील हे आज सकाळी या प्रकरणी गुन्हा दाखल करणेकामी रामानंदनगर पोलीस स्थानकात गेले असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here