चाळीसगाव–(वार्ताहर) येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा विविध अध्यात्मिक उपक्रमांनी संपन्न झाला. स्वामी विवेकानंद यांची जयंती सर्वत्र युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्याच अनुषंगाने 12 जानेवारी बुधवारी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था घाट रोड येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी सेवा संस्थेच्या ध्यान मंदिरा मध्ये अध्यात्मिक पूजापाठ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग प्रशांत साळी यांनी उपस्थितांना कथन केले. त्याचबरोबर सेवा संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, युवक – युवती व इतर नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत ची माहिती सांगितली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश जानराव, मनोहर कांडेकर, जिजाबराव वाघ, सुनीलसिंह राजपूत, दिलीप घोरपडे, मंगेश शर्मा, मुराद पटेल, मयुर अमृत कार, प्रशांत साळे आदी उपस्थित होते. भाविक व नागरिकांसाठी हे ध्यान मंदिर सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत खुले असणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांना दिनदर्शिका, स्वामीजींचे फोटो, पुस्तक भेट देण्यात आली.