रानडुकराच्या हल्ल्यात तरुण शेतमजूर ठार

0
14

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आव्हाणे शिवारात आज सकाळी शेतात काम करणार्‍या शेतमजुरावर अचानकपणे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतमजुर ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाणे येथे कैलास उत्तम नाईक (वय ३०) हा शेतमजुरी रहिवासाला असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमजुरी करुन करतो. नेहमीप्रमाणे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह आव्हाणे शिवारात दादर कापण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आई-वडिल, पत्नीसह काही मजुरांसह दादर कापत असतांना शेताच्या बांधावर लपलेल्या मोठ्या रानडुकराने अचानक कैलास नाईक याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेत असतांना आव्हाणे फाट्याजवळच त्याची प्राणज्योत मालविली. कैलास याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला आहे. मयत कैलास यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, २ मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसात नोंद करण्याचे कामकाज सुरु होते. दरम्यान, या घटनेमुळे आव्हाणे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here