राज ठाकरेंची कलाकारांसोबत बैठक, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन

0
25

मुंबई : सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे कला क्षेत्रात मोठे संकट उभे ठाकले आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु, असं आश्वासन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिले.

दोन दिवसात याविषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली.

https://www.facebook.com/mnsadhikrutpage/posts/3996348630456974

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here