मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. . मंत्री आदित्य ठाकरेंनी कोविड टास्क फोर्सशी चर्चा करुन शाळा सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. आता शाळाबरोबरच राज्यातील महाविद्यालयेही सुरु होणार का, याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे
शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालयं पुन्हा ऑफलाईन सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार प्रस्ताव पाठवणार असल्याचं त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. उदय सामंत म्हणाले, “कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही. त्यामुळे निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील. 15 फेब्रूवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईनच होतील”
सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. राज्यातील महाविद्यालये चालू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आणि प्रस्तावअंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार असल्याचे उदय सामंत यांनी ट्वीट करत म्हटले आहे. त्यामुळे अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री ठाकरेच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.