मुंबई, वृत्तसंस्था । भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात.
राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला असल्याबाबत कुणाचे दुमत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.