जामनेर (प्रतिनिधी):- आज दी.१२ जानेवारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त येथील राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व परिवर्तन वादी संघटनेच्या माध्यमातून जिजाऊ पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवप्रेमींची कोरोनाचे नियम पाळून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले.
यावेळी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, जामनेर तालुका एजु.चे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,नगर सेवक महेंद्र बावीस्कर, सुहास पाटील, सुधाकर माळी, उल्हास पाटील, दत्तात्रय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पप्पू पाटील, प्रल्हाद बोरसे, अमोल पाटील यांच्या सह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.