जळगाव ः प्रतिनिधी
येथील आकाशवाणी चौफुलीनजिकच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांचे जयंतीनिमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस. महाजन सर यांनी प्रास्ताविकात मॉं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील व लहान बालकांनी मॉंसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत दोघांचे प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ऍड. भैय्यासाहेब यांनी या दोघंही महान विभूतींच्या कार्याबद्दल आपले मनोगतातून सविस्तर माहिती सांगितली.
याप्रसंगी वाय.एस. महाजन सर, स्वप्निल नेमाडे, महिला जिल्हाध्य्क्षा कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, सुनिल माळी, किरण राजपूत, ऍड. राजेय गोयर, राजु भंगाळे, चंद्रकांत चौधरी, शांताराम सोनवणे, संजय चव्हाण, जयश्रीताई पाटील, मिनाक्षीताई चव्हाण, डॉ.ऐश्वर्या राठोड, कमलताई पाटील, ममता तडवी, जुबेदाताई तडवी, नामदेव पाटील, सतिश चव्हाण आदी उपस्थित होते.