राजकारणात ज्यांना जन्माला घातले, ते मला झाले नाही, ते तुम्हाला काय होणार? ः एकनाथराव खडसे

0
31

जामनेर ः विशेष प्रतिनिधी
मी पुन्हा येईन, म्हणणार्‍यांनी माझे तिकीट कापले तेव्हाच ते थांबले, पुन्हा येण्याचा प्रश्नच आला नाही. ज्या पक्षासाठी आयुष्याची ४० वर्ष खर्ची घातली, ज्यांना राजकारणात मी जन्माला घातले ते मला झाले नाही, ते तुम्हाला काय होतील,असा खडा सवाल माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी काल जामनेर येथील राष्ट्रवादी परिवार संवाद सभेत केला.
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद बैठक पक्षाचे वरीष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष तथा आघाडी सरकार मधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच पदार्पण केलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बोदवड चौफुल्ली वरील बोहरा मंगल कार्यालयात काल रात्री झाली.
यावेळी एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली.पुढे बोलतांना खडसे म्हणाले की, तुमच्या जामनेर तालुक्यात जे काही जलसंपदाची कामे झाली आहेत,ती मी मंत्री असताना झाली आहेत.गेल्या पाच वर्षांत तुमच्या तालुक्याला जलसंपदा खाते मिळाले होते.किती धरणे नवीन तुमच्या मतदार संघात झाली.ते तुम्हीच सांगा. जी कामे माझ्या काळात अपूर्ण होती ती तरी पूर्ण झाली का? कमानी तांडा प्रकल्प अपूर्ण होता तो तरी पूर्ण झाला का? मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतांना जयंत पाटील मला विनोदात म्हणाले होते , नाथाभाऊ तुम्ही प्रवेश केला तर तुमच्यामागे इडी लागेल ना..त्यावेळेस मीही त्यांना विनोदाच म्हणालो होतो, माझ्या मागे इडी लागली तर, मी सीडी लावेल.. आता इडी तर लागली त्यांचे काम झाले.. आता आपली बारी आहे.त्यावेळी जनतेतून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केल्यानंतर हे माझे पहिलेच भाषण आहे. अजून बराच संवाद साधायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात मोठा करायचा आहे, संघटन मजबूत करायचे आहे. त्यावेळेस बोलूच असेही ते म्हणाले.
यावेळी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्याने बांधणी बाबत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच फ्रंटच्या पदाधिकार्‍यांचा आढावा घेतला व संघटन मजबूत करण्यासाठी सूचना केल्या तसेच आपल्या सोबत आता नाथाभाऊ असल्याने आपली ताकद जिल्ह्यात वाढणारच आहे यात शंकाच नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना जो कोणीही त्रास देत असेल त्याची गय केली जाणार नाही. सत्ता आपली आहे. राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपला परिवार समजून काम करावे अशा सूचना प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांच्याकडून देण्यात आल्या.यावेळी त्यांच्या समवेत.मेहबूबभाई शेख प्रदेश युवक अध्यक्ष,सुनील गव्हाणे विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष, रोहिणीताई खडसे, युवती प्रदेश अध्यक्ष सक्सेना सलगर , महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, रविकांत वरपे,रविंद्र पाटील,माजीमंत्री गुलाबराव देवकर,मनिष जैन,ललित बागुल,संजयदादा गरुड,.वंदना चौधरी,प्रदेश सचिव,अशोकदादा चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, विलास राजपूत, संदीप हिवाळे, जितेश पाटील, अमोल पाटील, प्रभू झाल टे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here