मलकापूर(सतीश दांडगे): येथील माकनेर तालुका मलकापुर जिल्हा बुलढाणा येथील विद्यार्थिनी अवंतिका शेषराव खरसने हि युक्रेन या देशात शिकण्यासाठी गेलेली असून तिला भारत देशात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदनाद्वारे वडील शेषराव प्रभाकर खरसने यांनी मागणी केली आहे.
युक्रेन नाटो संघटनेचे सदस्य होऊ इच्छित आहे मात्र रशियाचा त्याला विरोध आहे यावरून दोन्ही देश आमने-सामने आले आहेत. रशिया युक्रेनमध्ये संघर्ष पेटला असून दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची चर्चादेखील जगभर होऊ लागली आहे.
भारतीय विद्यार्थिनी अवंतिका शेषराव खरसने ही विद्यार्थिनी युक्रेन देशातील नॅशनल पिर्गोव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटी विनीतया येथे मेडिकल च्या प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेतला असून ती दि. 15 नोव्हेंबर 2021 पासून शिक्षण घेत आहे. तर सध्यास्थितीत युक्रेन रशिया या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ती अद्यापर्यंत युक्रेन या देशात अडकलेली आहे तिला भारत देशामध्ये परत आणण्याकरिता मदतीची नितांत गरज आहे तरी भारत सरकारच्या राष्ट्रीय स्तरावरून माझ्या मुलीला मायदेशी आणण्यास मदत करा असे निवेदनामध्ये शेषराव खरसने यांनी म्हटले आहे.
