रक्तपेढी विवंचनेत असताना मनियार बिरदारीचा मदतीचा हात

0
43

जळगाव ः प्रतिनिधी
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा होत असलेला तुटवडा व त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संघटनांना रक्तदानाविषयी आवाहन केले असता जळगाव जिल्हा मनियार बिरदारीने त्यास प्रतिसाद देत नशिराबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज रक्तपेढीला ७१ बॅगेचे संकलन करून दिले.
जळगाव येथील फिजिशियन तज्ञ डॉक्टर मंधार पंडित यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष गफ्फारभाई मलिक होते तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य पर्यवेक्षिका खैरून उन्निसा शेख, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, विनोद रंधे, चंदू पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष मझर खान,उपाध्यक्ष नशिराबादचे बरकत अली, भुसावळचे सरचिटणीस इम्तियाज शेख,नशिराबादचे अय्युब मेंबर,रियाझ मानियार,इस्माईल मानियार व मोहम्मद रईस सैयद यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम रक्तपेढीचे डॉक्टर सईद शेख यांनी कुराण पठण केले व रक्तदानास सुरुवात करण्यात आली.
सहा डिसेंबर हा संपूर्ण भारतात महा परिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो तसेच या ६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जिदला शहीद करण्यात आले होते.या दोघा क्षणाचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्यासाठी आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक तथा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद
रक्तदानासाठी सर्व समाजातील तरुणाईने व खास करून विविध राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या तरुणाईने या रक्तदानामध्ये स्वेच्छेने सहभाग नोंदवून आपली त्याग व बलिदानाची भूमिका स्पष्ट केली.
डॉक्टर उल्हास पाटील रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर नितीन भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निखील मेहता, मेडिकल ऑफिसर सीनियर टेक्निशियन सईद शेख, टेक्निकल सुपरवायझर रितेश वारके, टेक्निशियन राज तवर, जनसंपर्क प्रमुख लक्ष्मण पाटील, नर्स शीतल बावणे व ऐश्‍वर्या थुल यांनी रक्त संकलित केले. यशस्वीतेसाठी जळगावचे ताहेर शेख,मोहसीन शेख,समीर शेख,नशिराबादचे रईस सैयद,मोहम्मद रईस, सलमान शेख,फझल कासार, अहमद शेख सत्तार, शेख फ़ायझ, अझरुद्दीन पिंजारी, सय्यद जहीर रियाज, सय्यद इस्माईल सय्यद शेख, ताहेर शेख ,अन्वर शेख, समीर शेख अन्सार व सद्दाम शाह आदींंनी प्रयत्न केले.
सर्व दात्यांना प्रमाणपत्र रक्तपेढीतर्फे देण्यात आले तर आयोजन केल्याबद्दल रक्तपेढीचे संक्रमण अधिकारी डॉ. नितीन भारंबे यांनी फारूक शेख यांचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here