जळगाव ः प्रतिनिधी
तब्बल ४२ वेळा रक्तदान करणारे संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांचा जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व राजपूत करणी सेना खान्देश विभागातर्फे नववर्षानिमित्ताने काल कांताई सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक
नागोजीराव चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, करनी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विजय निकम, किशोर रायसाकडा, पराग कोचुरे, भगवान मराठे, कमलेश देवरे, संतोष ढिवरे,धर्मेश पालवे, संजय तांबे, दीपक सपकाळे, डॉ. सुरेश पाटील, विलास राजपूत, अमोल कोल्हे, जितू पाटील, किशोर नेवे, राजेंद्र वाणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.