या सोंगाड्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्याचा बोलविता धनी …? चित्रा वाघ संतापल्या

0
10

मुंबई : मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणाऱ्या किरण मानेला (Kiran Mane) प्रोडक्शन हाउसने हाकलून दिले आहे. मग मानेने नवे नाट्य उभे केले. महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टीका करणाऱ्या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत! असा आरोप भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला व कोण आहेत मानेचे बोलवते धनी ? असा प्रश्न विचारून या सोंगाड्यावर कारवाई करा. शिक्षा झालीच पाहीजे, अशी अंगणी केली.

 

प्रकरण
प्रकरण असे की, स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील किरण माने या अभिनेत्याला संबंधित वाहिनीने तडकाफडकी मालिकेतून डच्चू दिला. यानंतर किरणने ‘मी सत्तारूढ (भाजपा) पक्षाच्या नेत्यांवर टीका करणारी पोस्ट टाकल्याने मला राजकीय दबावामुळे मालिकेतून काढले’ असा आरोप केला. राष्ट्रवादीने नेते शरद पवार यांच्याकडे गाऱ्हाणे नेले. यानंतर मराठी कलाक्षेत्र आणि राजकारण ढवळून निघाले आहे. सोशल मीडियावर किरणच्या समर्थनात आणि विरोधात पोस्ट सुरू आहेत. कला व राजकानाशी संबंधित अनेक नेतेही या वादात उतरले आहेत.

किरण मानेच्या मताशी हमत नाही – आदेश बांदेकर
अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसात मला असा कुठलाही अनुभव आलेला नाही. कुठलेही चॅनेल असे करत नाही. किरण माने यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचे आहे म्हणून ते हे सगळ करत आहेत, असे शिवसेनेचे नेते व अभिनेते आदेश बांदेकर म्हणालेत.

त्यांच्या वर्तणुकीमुळे बाहेरचा रस्ता दाखवला – मनसे (MNS)
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर याबाबत म्हणालेत की, मला यावर काहीही बोलायचे नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले.किरण याच्या ‘मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केले’ या आरोपावर खोपकर म्हणालेत की, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल. अभिनेत्री अनिता दाते आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी किरणला समर्थन दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here