यावल प्रतिनिधी । यावल शहरातील व ग्रामीण परिसरातील आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेतीलत ३६ मंडळांनी आज पाचव्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आली.
यावल शहरासह पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीगणेशाची उत्साहात स्थापना केली आहे. आज पाचव्या दिवशी शहरातील १९ व ग्रामीण क्षेत्रातील १७ गणेश मंडळांच्या वतीने आजच्या श्रीगणेशचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षा प्रमाणे यंदा ही कोरोना संसर्गाचे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार श्रीगणेशाची स्थापना करण्याचे आदेश दिल्याने कोणत्याही श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने स्थापनेच्या वेळी मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने एकाही मंडळाने श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत वाजंतत्री लावली नाहीत अतिश्य साद्या पद्धतीने यंदा ही गणपती बाप्पाचे शांततेत विसर्जन करण्यात आले. यावल शहरातील एकुण १९ गणेशोत्सव मंडळानी तथा ग्रामीण क्षेत्रातील डांभुर्णी- ६ , नायगाव एक गाव एक गणपती, सावखेडासिम-३ , दहीगाव- ४ गणेश मंडळांनी व कोरपावलीतील ३ अशा ९४ पैक्की ३६ श्रीगणेश उत्सव मंडळानी या विसर्जन मिरवणुकीत विघ्नहर्ता श्रीगणेशाला निरोप देण्यात आले