Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल वन विभागाच्या कारवाईत १३ घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त
    जळगाव

    यावल वन विभागाच्या कारवाईत १३ घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

    saimat teamBy saimat teamMarch 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    यावल वन विभागाच्यावतीने १० मार्च रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी १० वाजता वरीष्ठ अधिकार्‍यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.
    या धाडसत्रात बाभूळ,निलगीरी,निम व इतर असे एकूण १३ घनमीटर माल आढळून आल्याने तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच १८ इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
    सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.