यावल, प्रतिनिधी । दि. १६ रोजी यावल येथील धनश्री चित्रमंदिरात हिंदुस्तान इन्सेक्ट साईड लिमिटेड या कंपनीतर्फे एकात्मिक किड व्यवस्थापन या विषयावर शेतकरी बंधूंना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मयूर नितीन चौधरी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण ट्रमा सेंटर भुसावल हे होते. त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कंपनीचे जनरल मॅनेजर शशांकजी चतुर्वेदी हे उपस्थित होते.तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ डॉ. बाहेती सर इंजिनिअर वैभव सूर्यवंशी सर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म यांनी शेतकऱ्यांना केळी व कापूस या पिकाबद्दल मार्गदर्शन केले तसेच डी.पी.कोते तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती यावल सिरनारे साहेब, तालुका कृषी अधिकारी यावल, डी.एस.हिवराळे कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर विकास जी यादव हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी तालुका व परिसरातील प्रगतशील शेतकरी बांधव वेळात वेळ काढून उपस्थित होते कार्यक्रमासाठी कंपनीचे अधिकृत वितरक साई ऍग्रो एजन्सी चे संचालक प्रशांत शिंदे यांनी व यावल शहरातील कृषी सेवा केंद्र संचालकांनी मोलाचे सहकार्य केले.