यावल, तालुका प्रतिनिधी I येथील पोलिस स्थानकातील कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल पोलिस स्थानकातील एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता. आणखी दोन कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून या तिघ कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील इतरांची ही तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले असून वैद्यकिय यंत्रणा कामाला लागली आहे.