यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात नालाबांध, रस्ते, पुलाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची

0
13

यावल, प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे जे होत आहे त्यापैकी 95 टक्के विविध बांधकामे ही राजकीय प्रभावामुळे आणि काही ठेकेदारांकडून टक्केवारी वाटप केली जात असल्याने तसेच अनेक ठिकाणी झेरॉक्स ठेकेदाराना,काम करण्याची माहिती नसलेले, आवश्यक यंत्रसामग्री नसलेले काही ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तालुक्यात यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची बांधकामे, फुलाची बांधकामे,पुलावरील गटावर ढापे,घरकुले,नाला बांध, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने नायगाव,किनगाव,पाडळसे येथील मनुदेवी रस्त्यावर भालोद, बामणोद परिसरात किनगाव डांभुर्णी,डोंगर कठोरा,सातोद कोळवद,वड्री भागात अत्यंत निकृष्ट प्रतीची कामे होत आहे तर काही कामे संबंधितांना टक्केवारी मिळत नसल्याने बंद आहेत.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून काल दिनांक 18 रोजी IAS अधिकारी नेहा भोसले यांनी पदभार स्वीकारला त्यांनी यावल तालुक्यातील झालेल्या विविध बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास निकृष्ट कामांचे फार मोठे रॅकेट उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही असे अहवाल तालुक्यात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here